स्मिता पाटीलवरील लघुपट अंतिम फेरीत : “मुव्हिपेडिया’ चित्रपट महोत्सव

ऑनलाईन मतदानाचे आवाहन

नवी दिल्ली – भारतीय सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केलेल्या दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलच्या जीवनावरील “असं एखादं पाखरु वेल्हाळ…’ हा लघुपट नवी दिल्ली येथील “मुव्हिपेडिया’ चित्रपट महोत्सवाच्या “फिल्ममेकर ऑफ द मंथ-फेब्रुवारी 2021′ या गटात अंतिम फेरीत निवडला गेला आहे. त्यासाठी सिनेप्रेमींनी ऑनलाईन मतदान करुन या सिनेमाविषयीची पसंती कळवावी, असे आवाहन निर्माती मृणाल घोळे मापुसकर यांनी केले आहे.

स्मिता पाटील यांचे वास्तविक जीवन आणि पडद्यावरील भूमिका यामध्ये असलेले साम्य आणि त्याबाबत आजच्या पिढीची प्रतिनिधी असलेल्या क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट मृणाल घोळे-मापुसकर यांनी साधलेला संवाद हा या प्रयोगशील लघुपटाचा मुख्य विषय आहे. कवी, पत्रकार श्रीनिवास वारुंजीकर यांनी या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे, तर कुमार डोंगरे यांनी छायाचित्रण व संपादन केले आहे.

इंग्लंडमधील पाईनवुड स्टुडिओजच्या “लिफ्ट-ऑफ सेशन्स’ आणि “फर्स्ट-टाईम फिल्ममेकर्स’ या फिल्म फेस्टीव्हल्ससह भारतातल्या धर्मशाळा, केरळ आणि नवी दिल्लीतील विविध फिल्म फेस्टीव्हल्समध्ये “असं एखादं पाखरु वेल्हाळ…’ या लघुपटाचे स्क्रीनिंग आजवर झाले असून त्याला नामांकितांची दादही मिळाली आहे. तरी आपल्या आवडत्या मराठमोळ्या स्मिता पाटीलच्या जीवनावरील या लघुपटाला ऑनलाईन व्होटींग करावे, असे आवाहन मापुसकर यांनी केले आहे.

“मुव्हिपेडिया’ फिल्म फेस्टीव्हलसाठीची लिंक अशी आहे…
https://moviepediafilms.com/movie/189/asa-ekhada-pakharu-velhal

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.