वडगाव मावळ – कान्हे फाटा (ता. मावळ) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात एक आठवड्यापासून खोकल्याच्या (कप सिरप) औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ग्रामीण रुग्णालयात औषधे उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कान्हे फाटा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात अंतररुग्ण व बाह्यरुग्ण असतात. त्यातच करोनाच्या पार्श्वभूमीवर खोकल्याच्या औषधांची मागणी रुग्णालयात होत आहे. या रुग्णालयात खोकल्याच्या औषधांचा एक आठवड्यापासून तुटवडा आहे.
गरीब, गरजू रुग्णांना सहा महिन्यांपासून हाताला काम नसल्याने आर्थिक अडचणीत आहेत. या रुग्णालयात औषध उपलब्ध नसल्याने गरीब, गरजू रुग्णांची गैरसोय होत आहे. तर खोकल्याचे औषध उपलब्ध करण्याची मागणी माजी उपसरपंच किशोर सातकर, सामाजिक कार्यकर्ते रमेश भुरुक, सोमा भेगडे, आशिष खांडगे आदींनी केली.