शॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘सेल्फी विथ सावरकर’

‘सेल्फी विथ सावरकर’ या लघुपटाच्या सुरुवातीला पुण्याचा नकाशा दाखविण्यात आला असून, वाढणारी वाहने, नदीचे प्रदूषण, रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा असे फोटोज दाखविले आहेत. याची सुरुवात तीन मित्रांपासून होते प्रणव गण्या आणि मन्या. तिघेही एकमेकांना कॉलेजविषयी बोलत असतात. तेव्हा त्यातील गण्याची नजर रस्त्याकडेला असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकावर पडते. आणि तो म्हणतो, सावरकरांच्या पुतळ्याच्या जागेवर मन्या चांगला दिसेल. यावर प्रणव म्हणतो, पुतळ्यावरून मस्करी नको. तो पुतळा आपल्याकडे कसा पाहतोय बघ. हे ऐकल्यावर बाकीचे दोन मित्र त्याची थट्टा उडवतात. व तेथून निघून जातात. प्रणवही सावरकरांच्या पुतळ्याकडे पाहत त्यांच्यामागे जातो.

दुसऱ्या दिवशी पुन्हा तिघेही मित्र सावकारांच्या स्मारकाजवळून जात असतात. आणि प्रणवचे मित्र स्मारकाजवळून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात प्रणव त्यांना थांबवतो आणि समोरून जाऊ असे म्हणतो. याचे कारण विचारले असतात प्रणव सांगतो, काल तो पुतळा माझ्याकडे पाहून हसत होता. हे ऐकून त्याचे मित्र त्याला वेड्यात काढतात. तिसऱ्या दिवशी प्रणव आपल्या दोन्ही मित्रांची वाट पाहत स्मारकाजवळ उभा असतो. थोड्या वेळाने तो स्मारकाच्या आता जाऊन बसतो. मोबाईलवर गेम खेळत असतानाच त्याची नजर सावरकरांच्या पुतळ्यावर पडते. तो पुतळ्याजवळ जाऊन सावरकांच्या नेमप्लेटवरील धूळ स्वच्छ करतो. नंतर रात्रीही प्रणवला सावरकरांचा पुतळाच नजरेसमोर दिसत असल्याने झोप लागत नाही. बराच वेळ झाला तरी झोप लागत नसल्याने प्रणव कपाटातून ‘काळे पाणी’ पुस्तक वाचण्यास काढतो.

स्मारकाजवळून पुन्हा जाताना प्रणव गण्या आणि मन्याला पुढे पाठवितो. आणि सावरकरांच्या पुतळ्याजवळ जातो. व पुन्हा त्यांच्या नेमप्लेटवरची धूळ पुसत असताना प्रणवला एक आवाज ऐकू येतो. थांब, काय करतो आहेस. हे ऐकून प्रणव आजूबाजूला पाहतो. पुन्हा आवाज येतो कि समोर बघ. काय सारखं माझ्या नावाला हात लावायचा प्रयत्न करत आहेस. प्रणव आश्चर्यचकित होऊन कोण बोलतोय विचारतो. यावर मी विनायक दामोदर सावरकर बोलतोय, असा आवाज येतो. हे ऐकल्यावर प्रणव त्यांना घाबरतच काय पाहिजे विचारतो. यावर मूर्ख मुला अजिबात मला हात लावू नकोस. धूळ नावावरील झटकशील परंतु तुमच्या नवीन पिढीच्या डोळयांवरील कशी झटकणार? नुसते पुस्तकी किडे. स्वतःच डोकं चालवायचं नाही. तुमच्यासारखी मूर्ख, अल्लड मुले पाहिली ना तर मन असे तीळतीळ तुटते. हे ऐकल्यावर प्रणव म्हणतो, मी केवळ धूळ पुसत होतो.

सावरकर पुन्हा एकदा म्हणतात, चालत हो इथून. म्हणे धूळ झटकत होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आला असता तर कळले असते कि आम्ही नवीन भारतासाठी काय काय केले आहे. प्रणव म्हणतो, तुम्हाला त्रास होत असेल तर मी जातो. मी रोज येथूनच ये-जा करत असतो. काही पाहिजे असल्यास सांगा मला. फक्त भीती दाखवू नका. हे ऐकल्यावर सावरकर म्हणतात, जा येथून. सहानभूती छे. साहजिक आहे रात्रभर पुस्तक वाचून काढल परंतु, मला जे पाहिजे ते नाही देऊ शकत तू. प्रणव काय पाहिजे असे विचारल्यावर सावरकर म्हणतात, या गाड्यांचा, वर्दळीचा आवाज  नको वाटतो. कुठेतरी शांत ठिकाणी घेऊन जाशील का? यावर प्रणव म्हणतो, हे शक्य नाही. आणि तुम्हाला काही समस्या आहे का येथे?

सावरकर म्हणतात, धूळ, प्रदूषण, ये-जा करणारे सुज्ञ नागरिक कचरा माझ्या पुतळ्याच्या मागे टाकतात. खूप घाणेरडे वास येतात. हे एकूण प्रणव म्हणतो, मला सांगितले तसे इतरांनाही सांगायचे. मला कमीत-कमी तुमच्या नावावरही धूळ पुसू द्या म्हणजे मनाला बरे वाटेल. यावर सावरकर म्हणतात, ठीक आहे पण एका अटीवर. आज शहरात माझ्यासारखेच किती पुतळे आहेत जे दद्ययनीय अवस्थेत आहेत त्यांनाही साफ करावे लागेल. ही आत ऐकून प्रणव लगेच होकार दर्शवितो आणि केवळ माझ्या मित्रांसमवेत सेल्फी घेण्याची अट त्यांच्यापुढे ठेवतो. आणि तेथून निघतो.

प्रणवच्या घरी त्याचे दोन्ही मित्र येतात. व तो त्यांना सर्व घटनाक्रम सांगतो. हे ऐकून गण्या म्हणतो, तुला वाटते का यामुळे काही बदल घडेल? यावर प्रणव म्हणतो, स्वराज्य जिंकायचं असेल तर स्व म्हणजे स्वतः आणि राज्य म्हणजे मन. स्वतःच मन जिंकले पाहिजे. आपण हे करू शकतो. आणि तिघे मिळून शहरातील जवळपास सर्व पुतळे स्वच्छ करतात आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढतात.

आज देशभरात अनेकांचे पुतळे त्यांच्या कार्याप्रती आदर म्हणून उभे केले आहेत. परंतु, त्यांचे विचार कोणीच घेत नाही. त्या पुतळ्याचे उदघाटन झाले कि त्याच्याकडे केवळ जयंती आणि पुण्यतिथीशिवाय कोणी फिरकतही नाही. तसेच आपल्या देशातील काही नागरिक तेथेच कचरा करतात. हे थांबण्याची कुठेतरी गरज आहे. नुसते पुतळे उभे करून नव्हे तर त्यांचे विचारही आपण कृतीत आणायला हवे.

– श्वेता शिगवण 

Leave A Reply

Your email address will not be published.