शॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘लडकी हात से निकल जायेगी’

लघुपटाच्या सुरुवातीला छकुली नावाची एक मुलगी शाळेत जायच्या तयारीत असते. तिचे बाबा छकुलीला लवकर निघण्यासाठी बाहेरून आवाज देत असतात. ती पटापट आवरून बाहेर येते. व दोघेही सायकलवरून निघतात.

रस्त्यात एका ठिकाणी छकुली आणि तिचे बाबा वर्तमानपत्र घेत असताना त्यांना एक मित्र भेटतो. तो म्हणतो, अरे व्वा! छकुली शाळेत जायला लागली. चांगली गोष्ट आहे. पण जरा सांभाळून मुलगी लिहायला-वाचायला शिकली तर ‘हात से निकाल जायेगी.’ हे ऐकून छकुली विचारात पडते. व तेथून निघाल्यावर छकुली आपल्या बाबांना विचारते, मी हाताच्या बाहेर का जाईल? यावर तिचे बाबा म्हणतात, आता तू शाळेत जाणार आहेस. मनापासून अभ्यास करून पहिला नंबर मिळविणार. आणि मग मोठ्या शहरात जाऊन इंजिनिअर बनणार. तेवढ्यात छकुली म्हणते, मी इंजिनिअर नाही तर पायलट बनणार आहे. हे ऐकून तिचे बाबा खुश होतात. व पुढे म्हणतात, तू पायलट बनल्यावर विमानातून मला फ्रीमध्ये फिरवशील. पायलट बनून तू खूप पैसे कमवशील आणि नंतर स्वतःचे निर्णय स्वतः घेशील. मोठमोठ्या अभिनेत्रींसारख्या जीन्स पॅंट घालशील. जेव्हा इच्छा होईल, जिथे मनाला वाटेल तिथे तू मुक्तपणे जाशील, असे म्हणत असतानाच ते शाळेत पोहोचतात.

छकुली त्यांना म्हणते, मग ‘हात से निकाल जाना’ अच्छा है ना? यावर तिचे बाबा म्हणतात, खूप चांगले आहे. असे म्हंटल्यावर छकुली हसत शाळेत जाते.

मुलगी म्हणून आपल्या मुलींवर कोणतेही बंधने लादू नका. तिला मुक्तपणे उडू द्या. आज वेगवेगळ्या क्षेत्रात मुली ऐतिहासिक कामगिरी करत आहेत. मुलांबरोबर मुलीही खांद्याला खांदा लावून आपले स्वप्न पूर्ण करू पाहत आहेत. परंतु, आजही समाजात अशी काही लोक आहेत. जी मुलींना समान दर्जाची वागणूक देत नाहीत. कळ्यांचा उमलण्याधीच जीव घेतात.

– श्वेता शिगवण

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.