शॉर्ट फिल्म कॉर्नर : आय अॅम दॅट चेंज

‘आय अॅम दॅट चेंज’ हा लघुपट तीन भागांमध्ये वर्गीकृत करून दाखविला आहे. सुरुवातीला एक माणूस फोनवर बोलत गाडी चालवत असतो. हे पाहून वाहतूक पोलीस त्याला अडवतो व जाब विचारतो. परंतु, तो कारचालक त्याला नोट दाखवितो. हे पाहून वाहतूक पोलीस विचारात पडतो. दुसऱ्या दृश्‍यात शालेय मुलींचे पेपर चालू असतात. यावेळी तृप्ती विचार करत बसली असते. परंतु, तिला पेपरमध्ये काहीच आठवत नसते. हे पाहून तिच्या शेजारील मुलगी तृप्तीला आपला पेपर दाखविते. तृप्तीही तो पेपर घेते. मात्र विचारात पडते.

तिसऱ्या दृश्‍यामध्ये एक मुलगा आपल्या वडिलांसोबत रस्त्याने जात असतो. यावेळी तो आपल्याकडील कचरा साफ केलेल्या रस्त्यावर टाकतो. व पुढे जाऊन अचानक थांबतो. शेवटच्या दृश्‍यात सिक्‍युरिटी आतमध्ये येणाऱ्या माणसांची चेकिंग करत असतो. तेवढ्यात त्याठिकाणी तामिळ सुपरस्टार अल्लू अर्जुन येतो. व चाहते त्याला गराडा घालतात. यावेळी अल्लू अर्जुन सिक्‍युरिटी चेकिंग न करताच आतमध्ये प्रवेश करतो. व पुढे थांबून विचार करू लागतो. व अल्लू अर्जुन पुन्हा सिक्‍युरिटी चेकिंग करण्यास सांगतो. तिसऱ्या दृश्‍यातील मुलगा रस्त्यावर फेकलेला कचरा स्वतः उचलून कचरा पेटीत टाकतो. तृप्तीही तिला कॉपी करण्यासाठी दिलेला पेपर न पाहताच परत करते. व पहिल्या दृश्‍यातील वाहतूक पोलीस कारचालकाने दिलेली नोट न घेता चलन देतो.

केवळ तीन मिनिटांचा लघुपट आपल्याला खूप काही शिकवून जातो. लाच देणारा जेवढा दोषी असतो तेवढाच घेणाराही असतो. मात्र, जर आपण लाच दिलीच नाही किंवा लाच समोर असूनही न घेता आपण आपले कर्तव्य बजावले तर आपला देश नक्कीच भ्रष्टचारमुक्त होऊ शकतो.

– श्वेता शिगवण 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)