न्यूयॉर्क : अमेरिकेतील गोळीबाराचे सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. दोनच दिवसापूर्वी कॅलिफोर्नियातील गुरुद्वाराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा कॅलिफोर्नियातूनच अशीच एक घटना समोर आली आहे. कॅलिफोर्नियाच्या नॅशविले भागातील एका प्राथमिक शाळेत चक्क एका महिलेकडून गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून यात तीन चिमुकल्यांचा समावेश आहे.
An active shooter event has taken place at Covenant School, Covenant Presbyterian Church, on Burton Hills Dr. The shooter was engaged by MNPD and is dead. Student reunification with parents is at Woodmont Baptist Church, 2100 Woodmont Blvd. pic.twitter.com/vO8p9cj3vx
— Metro Nashville PD (@MNPDNashville) March 27, 2023
समोर आलेल्या माहितीनुसार, टेनेसीच्या नॅशविले येथील एका शाळेत हल्लेखोर महिलेने गोळीबार केला. या हल्ल्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच अनेक जण गंभीर जखमी झाले होते.
दरम्यान, पोलीस आणि हल्लेखोर महिलेमध्ये चकमक झाली.प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोर महिला ठार झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, गोळीबार करण्यामागे महिलेचा नेमका उद्देश काय होता, याबाबत अद्याप अस्पष्टता असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.