Suraj Chavan | ‘बिग बॉस मराठी ५’चे पर्व चांगलेच गाजले. हा शो पहिल्यांदाच अभिनेता रितेश देशमुखने होस्ट केला होता. तर रीलस्टार सुरज चव्हाण याने या पर्वात विजेता पदाचा मान पटकावला होता. या शोचा ६ ऑक्टोबर रोजी महाअंतिम सोहळा पार पडला होता. त्यावेळी लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुरजसोबत चित्रपट करण्याची घोषणा केली होती. अखेर त्याच्या ‘झापुक झुपुक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला आहे.
अभिनेत्री दीपाली पानसरेने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘झापुक झुपूक’ चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत दीपाली पानसरेने लिहिलं, ‘जे ठरवलं होतं ते सत्यात उतरलं. मी गेल्या कित्येक दिवसांपासून केदार शिंदेंबरोबर काम करण्याची वाट पाहत होते. अखेर तो क्षण आलाच. केदार शिंदे आणि बेला शिंदे तुमचे खूप खूप धन्यवाद. ‘झापुक झुपूक’ टीमला शुभेच्छा.’
यात अभिनेता इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत आणि दीपाली पानसरे झळकणार आहेत. या फोटोंवर चाहते आता कौतुकाचा वर्षाव करत आहेत. Suraj Chavan |
View this post on Instagram
सुरज चव्हाणच्या या चित्रपटाची तारीख अजून जाहीर झालेली नाही. मात्र सुरजच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, सूरज चव्हाणची अत्यंत बेताच्या परिस्थिती असल्यामुळे शिक्षण पूर्ण करता आलेलं नाही. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. टिकटॉक बंद झाल्यावर तो इन्स्टाग्राम रील्स बनवून लोकप्रिय झाला. सूरजकडे पैसा आणि प्रसिद्धी आल्यानंतर अनेकांनी त्याच्या स्वभावाचा फायदा घेत त्याची फसवणूकही केली होती. मात्र बिग बॉसमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. Suraj Chavan |
हेही वाचा:
विवेक ओबेरॉयला ‘ओम शांती ओम’ची दिली होती ऑफर; पण ‘या’ कारणामुळे दिला नकार