तापसी पन्नू सध्या “रश्मी रॉकेट’ च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती एका ऍथलीटचा रोल करते आहे. “रश्मी रॉकेट’चे बहुतेक शुटिंग गुजरातमध्ये झाले आहे. आता या सिनेमाच्या अखेरच्या शेड्युलला सुरुवात होते आहे. त्यासाठी तापसी भूजमध्ये रवाना झाली आहे. तिथले काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तापसीबरोबर अभिषेक बॅनर्जी आणि प्रियांशू पेन्यूली हेदेखील या या शेड्युलमध्ये आहेत.
सर्व कलाकारांनी करोनाच्या प्रतिबंधासाठी फेस शील्ड घातलेला एक फोटो तापसीने शेअर केला आहे. ऍथलीटच्या रोलसाठी तापसीने गेल्या काही महिन्यांपासून जोरदार सराव केला आहे. याचे फोटोही तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. सध्या तापसीकडे अनेक सिनेमे आहेत.
“शाबाश मितू’, “लूप लपेटा’ आणि “हसीन दिलरुबा’ सारखे काही भन्नाट विषयांवरचे सिनेमे आहेत. तापसीला “नाम शबाना’ पासून ऍक्शन रोल मिळायला सुरुवात झाली. त्यातच तिने “गेम ओव्हर’ सारखा ऍक्शन थ्रिलर सस्पेन्स सिनेमाही केला होता. मिताली राजचा बायोपिक असलेल्या “शाबाश मितू’ मध्ये ती क्रिकेट खेळतानाही दिसणार आहे.