Masti 4 Film | अभिनेता विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासनी यांची मुख्य भूमिका असलेला ‘मस्ती’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. ‘मस्ती’च्या यशानंतर ‘ग्रॅंड मस्ती’, ‘ग्रेट ग्रॅंड मस्ती’ असे सीक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यानंतर ‘मस्ती’ चित्रपटाच्या चौथ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. याचा एक व्हिडिओ विवेक ओबेरॉयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आफताब शिवदासिनी, विवेक ओबेरॉय आणि रितेश देशमुख यांची मस्ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. विवेक ओबेरॉयने ‘मस्ती-४’ च्या सेटवरील फोटो शेअर करत लिहिले, ‘मस्ती-४’ आता एक प्रेमकथा असून ‘ब्रोमान्स’ सुरू झाला आहे. पहिल्या चित्रपटानंतर २० वर्षांचा वेडपणा! माफ करा, मी लॉन्चिंला येऊ शकलो नाही. लवकरच शूटिंगला भेटू.” त्याचबरोबर अभिनेता आफताब शिवदासनीने सुद्धा सोशल मीडियावर ‘मस्ती-४’ च्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
आफताबने शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “वेडेपणाला सुरूवात झाली आहे, आतापर्यंतचा सर्वात मजेशीर प्रवास # ‘मस्ती-४’.” या पहिल्या फोटोमध्ये अभिनेता हातात क्लिपबोर्ड पकडून उभा असल्याचा दिसतो आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये रितेश देशमुख आणि दिग्दर्शक मिलाप झवेरी एकत्र पाहायला मिळत आहेत. शिवाय या फोटोत अभिनेते जितेंद्र देखील दिसत आहेत.
दरम्यान, मस्ती हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता जो सुपरहिट ठरला होता. 2013 मध्ये त्याचा सिक्वेल ‘ग्रँड मस्ती’ रिलीज झाला, ज्याचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले होते. त्याचा पुढचा भाग ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ 2016 मध्ये रिलीज झाला होता. परंतु ‘मस्ती 4’चे दिग्दर्शन मिलाप झवेरी करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 2025 च्या उत्तरार्धात किंवा 2026 च्या सुरुवातीला रिलीज होऊ शकतो.
हेही वाचा :
लोकसभेत सरकार आज ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडणार ; कायदा झाला तर निवडणुका कशा होणार?, वाचा