मुंबई – कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव लक्ष्यात घेता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला होता. त्यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सुरू केल्या गेल्या नाही. यादरम्यान, लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार आपल्या घरात बसून होते.
View this post on Instagram
We are back !😎 #maddamsir #haseenamallik💝🔫👉 #sonysab #gulkijoshi #khushiya #weareback #😎
मात्र, आता हळूहळू सर्व अनलॉक करताना दिसत आहेत. तसेच राज्य सरकारने चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी दिली आहे. पण त्यासाठी काही नियम आखण्यात आले आहेत.
हे सर्व नियम लक्षात घेऊन आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘मॅडम सर ’ शोचे चित्रीकरण सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेत्री गुल्की जोशी मालिकेत हसीना मलिक हे पात्र साकारणार आहे तिने सेटवर पुन्हा शूटिंग सुरु झाल्याचा आनंद माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला आहे.