यशच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज असून “केजीएफ 2′ चित्रपटाचे शूटिंग लवकरच संपणार आहे. यातील फक्त एका सीनचे शूटिंग बाकी आहे. चित्रपटाचे अंतिम वेळापत्रक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. करोनामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवले होते. परंतु ऑक्टोबरमध्ये पुन्हा सुरू झाल्यानंतर यशसह टीमने ते पूर्ण केले आहे.
View this post on Instagram
यश सांगितले की, “गेल्या काही काळापासून मी क्लेमॅक्सचे चित्रीकरण करत आहे. नवीन वर्षात चित्रपटाच्या शेवटचे वेळापत्रक आखले गेले होते. लॉकडाऊन संपल्यानंतर यश आणि चित्रपटातील अन्य कलाकारांनी नॉन स्टॉप काम करत शूटिंग पूर्ण केले आहे.
View this post on Instagram
पहिला भाग संपला तेथून “केजीएफ-2’ची सुरूवात होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या सीक्वलमध्ये यशसह संजय दत्त आणि रवीना टंडन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यश आणि संजय दत्त यांच्यातील संघर्ष पाहण्यास मिळणार आहे. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, “केजीएफ चॅप्टर -1’ने बॉक्स ऑफिसवर धम्माल केली होती. या चित्रपटामुळे यशला खुप प्रसिद्धी मिळाली. यामुळे या चित्रपटाच्या सिक्वलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.