मुंबई – नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नेहा शर्मा यांचे लीड रोल असलेल्या “जोगिरा सारा रा रा’ या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. स्वतः नेहा शर्माने या सिनेमातल्या सेट वरील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. “एक सुंदर यात्रा समाप्त झाली.’ असे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे आणि सर्व टीमला मनापासून धन्यवाद देखील दिले आहेत.
सगळे शूटिंग लखनौ आणि वाराणसीमध्ये झाले आहे. गालिब असद भोपाली यांनी लिहिलेल्या कथेवर हा सिनेमा आधारलेला आहे. कुशान नंदी यांनी याचे डायरेक्शन केले आहे. यावर्षीच जून-जुलैच्या सुमारास हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचा आणखी एक दमदार सिनेमा बघण्याची संधी प्रेक्षकांना या वर्षी मिळणार आहे.