“1942 अ लव्ह स्टोरी’तील बंगल्यात “भूत पोलीस’चे शूटिंग

“1942 अ लव्ह स्टोरी’तील बंगल्यात “भूत पोलीस’चे शूटिंग

यामी गौतम सध्या हिमाचल प्रदेशमध्ये “भूत पोलीस’ या आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने या सिनेमच्या सेटवरचे काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. हे शूटिंग हिमाचल प्रदेशातील डलहौसी या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी होत आहे. एका बंगल्याचे फोटो शेअर करून यामी गौतमने “हे ठिकाण ओळखले का?’ असा प्रश्‍न विचारला आणि त्याचे उत्तराही देऊन टाकले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)


अनिल कपूर आणि मनिषा कोईरालाचे लीड रोल असलेला आणि विधु विनोद चोप्राच्या 1994 सालच्या गाजलेल्या “1942 अ लव्ह स्टोरी’चे शूटिंग याच बंगल्यात झाले होते. हा बंगला बॉलीवूडसाठी अगदी फेव्हरेट शूटिंग डेस्टिनेशन आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)


कारण याच बंगल्यामध्ये 2013 साली “लुटेरे’चेही शूटिंग झाले होते. अशी आठवण विक्रांत मस्सीनेही सांगितली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून्‌ यमी गौतम हिमाचल प्रदेशात शूटिंग करते आहे. तिच्या “भूत पोलीस’चे डायरेक्‍शन पवन कृपलानी करत आहे. यामध्ये यामी गौतमबरोबर सैफ अली खान, जॅकलीन फर्नांडिस आणि अर्जुन कपूर देखील असणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.