हेले (जर्मनी) : बुधवारी जर्मनील हॅले शहरात रस्त्यावर दोन जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. ज्यू लोकांनी योम किप्पूर या पवित्र दिवशी उत्सव केला म्हणून बंदूकधाऱ्याने ज्यूंना लक्ष्य केले, असे साक्षीदारांनी सांगितले.
एका संशयिताला पकडण्यात आले होते परंतु अन्य गुन्हेगारांना पकडण्यासाठी शोध सुरूच होत. या हल्ल्यामुळे शहरांतील पूर्व भागातील “सेन्गॉग’मध्ये सुरक्षा अधिक कडक केली गेली आहे. तर हेले शहरात जवळपास नाकाबंदी केली गेली आहे.
प्राथमिक माहितीनुसार गोळीबारात दोघेजण ठार झाले आहेत. आणखीही काही गोळीबाराच्या फैरी झाडल्या गेल्या आहेत, असे पोलिसांनी ट्विटरवर म्हटले आहे. या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. हल्लेखोर कारमधून पळून गेले आहेत आणि एका संशयिताला पकडण्यात आले आहे, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
गुन्हेगारांनी उघडपणे पौलस जिल्ह्यातील एका “सॅन्गोग’मध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता पण त्या ठिकाणी सुरक्षा उपायांमुळे हल्ल्याचा प्रतिकार झाला. “योम किप्पूर’ हा दिवस ज्यू कॅलेंडरमध्ये सर्वात पवित्र दिवसांपैकी एक म्हणून मानला जातो. या पवित्र दिवसानिमित्त आयोजित प्रार्थनेसाठी “सेन्गॉग’मध्ये 70 आणि 80 लोक उपस्थित होते. येथील गोळीबारानंतर लष्करी गणवेशातील एका हल्लेखोराने ज्यूंच्या दफनभूमीच्या दिशेने एक हॅन्ड ग्रेनेडही फेकला होता.