कॉमनवेल्थ स्पर्धेतून नेमबाजी हटवली

लंडन- 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेतून नेमबाजी खेळाला हटवण्यात आले आहे. भारतासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

2018 मध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे कॉमनवेल्थ स्पर्धा पार पडली. यात भारताने एकूण 66 पदकांची कमाई केली होती आणि त्यापैकी 16 पदके नेमबाजीतून आली होती. भारताने 2018 मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पदकतालिकेत तिसरे स्थान पटकावले होते. नेमबाजीला या स्पर्धेतून डावलल्यामुळे भारताच्या पदकतालिकेतील स्थानावरही परिणाम होणार
आहे, शिवाय भारतीय नेमबाज एका मोठ्या व्यासपीठालाही मुकणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.