डियर जिंदगी नंतर अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री आलिया भट्ट पुन्हा एकदा एकत्रित काम करणार आहेत. ते आता आगामी “डार्लिग्ज’ चित्रपटात आई आणि मुलगी यांच्या नात्यातील एक सुंदर अशी गोष्ट साकारण्यासाठी एकत्रित आले आहेत.
परंतु अभिनेता शाहरुख हा एक निर्माता म्हणून पदभार सांभाळत आहे. शाहरुख खान आणि आलिया भट्टने पहिल्यांदा गौरी शिंदे यांच्या “डियर जिंदगी’मध्ये सोबत काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
या चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज इंटरटेन्मेंटकडून करण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा काही दिवसांपूर्वीच आलियाला सांगण्यात आली होती. तिला चित्रपटाची कथा खूपच आवडली असून तिने तातडीने होकारही दिला.
“डार्लिग्ज’मधून जसमीत के रेने ही दिर्ग्दशक म्हणून डेब्यू करत आहे, जिने यापूर्वी अनेक चित्रपटांत असोसिएट डायरेक्टर आणि चीफ असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच “फोर्स 2′, “फन्ने खां’ आणि “पति, पत्नि और वो’ यासारख्या चित्रपटांची पटकथा लिहिलेली आहे.
दरम्यान, “डार्लिग्ज’मध्ये आलियासोबत शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मैथ्यू आदी कलाकार मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच हा चित्रपट यंदाच्या वर्षीच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.