मेरठ – प्रसिद्ध नेमबाज शूटर दादी चंद्रो तोमर (वय 89) यांचे करोनाने निधन झाले. 26 एप्रिलला त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मेरठ येथील मेडिकल काॅलेजमध्ये उपचार सुरु होते. करोनाविरूद्धच्या लढ्यात आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कोरोना पाॅझिटिव्ह आल्यानंतर चंद्रो तोमर यांच्या ट्विटर पेजवरून माहिती देण्यात आली होती. ‘दादी चंद्रो तोमर यांची करोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इश्वर सर्वांचे रक्षण करो- कुटुंबिय’, असे ट्विट करण्यात आले होते. त्यानंतर चाहत्यांनी त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र त्यांचे निधन झाले.
जगातील सर्वात वयस्कर नेमबाज –
दादी चंद्रो तोमर यांनी वयाच्या 60 व्या वर्षी नेमबाजीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. त्यांच्यावर एक चित्रपट देखील तयार करण्यात आला आहे. त्यांना जगातील सर्वात वयस्कर नेमबाज म्हणून समजले जाते.