पाक लष्कराचा पुंछवर तोफगोळ्यांचा मारा

जम्मू: पाकिस्तानी लष्कराने प्रत्यक्ष ताबा रेषेनजिक पुंछ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तोफ गोळ्यांचा मारा केल्याचे वृत्त आहे त्यात भारतीय हद्दीतील दोन नागरीक जखमी झाले. मेंधर सेक्‍टर मधील बालाकोट या भागाला त्यांनी लक्ष्य करीत दुपारी हा मारा केला. त्याला भारतानेही प्रति गोळीबार करून प्रत्यत्तर दिले. या धुमश्‍चक्रीमुळे प्रत्यक्ष ताबारेषेनजिकच्या गावांतील गावकऱ्यांना अन्यत्र सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

या भागातील काही शाळांनाही या माऱ्याचा धोका उद्‌भवू शकतो ही शक्‍यता गृहीत धरून तेथील शाळा बंद करण्यात आल्या असून तेथील मुलांनाही अन्यत्र हलवण्यात आले आहे. दोन्ही देशांतील जवानांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुमश्‍चक्री सुरू आहे. भारताने पाक व्याप्त काश्‍मीरातील काही दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर पाक जवानांनीही प्रत्यक्ष ताबा रेषनजिकच्या अन्य ठिकाणांना लक्ष्य केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.