इन्फोसिसला मोठा झटका; ४५ हजार कोटींचे नुकसान 

मुंबई – देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखली जाणारी इन्फोसिस कंपनीला मोठा धक्का बसला आहे. इन्फोसिसच्या व्यवस्थापन विभागावर फेरफारचे आरोप लागल्यानंतर कंपनीचे शेअर १४ टक्क्यांनी खाली घसरले. यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल ४५ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना धीर धरण्याचा सल्ला दिला आहे.

इन्फोसिस कंपनीवर नफा आणि उत्पन्न अधिक दाखवण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने ताळेबंदमध्ये बदल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एका कर्मचाऱ्यांच्या ग्रुपने इन्फोसिस बोर्डाला २० सप्टेंबर रोजी पत्र लिहले आहे. पत्रामध्ये कंपनीचे सीईओ सलील पारेख यांच्याही नावाचा समावेश आहे. याप्रकरणी ईमेल आणि रेकॉर्डिंगसारखे सबळ पुरावे असून संचालक मंडळाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. हे पत्र २७ सप्टेंबर रोजी सेबीलाही (SEBI) देण्यात आले होते.

दरम्यान, याप्रकरणी इन्फोसिस चौकशी करण्यास तयार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.