कोलकाता : आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर देशभरातील नागरिकांनी रोष व्यक्त करत आंदोलन केली. तसेच घटनेचे गांर्भीय लक्षात घेत पश्चिम बंगाल सरकारला बलात्कार विरोधी कायदा पारित करणे भाग पडले.
ही घटना ताजी असताना आता कोलकाता येथे महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. कोलकाता येथीलपंचतारांकीत हॉटेलमध्ये महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे एकीकडे पश्चिम बंगालच्या विधानसभेत बलात्कार विरोधी कायदा पारित होत असताना दुसरीकडे ही घटना घडल्याने नागरिकांनाकडून संताप व्यक्त होतो आहे. दरम्यान, याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.