पंचकुला – हरियाणातील पंचकुलामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर सायकलला एका अज्ञात वाहनाने धडक मारली. या अपघातात सायकलस्वाराचा जागीचा मृत्यू झाला. परंतु, सायकलस्वाराच्या मृतदेहाला चिरडून अनेक वाहने पुढे जात होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांच्या माहितीनुसार, जीरकपूर-शिमला राष्ट्रीय महामार्गावर सायकलला एका अज्ञात वाहनाने धडक मारली. या अपघातात सायकलस्वाराचा जागीचा मृत्यू झाला. परंतु, सायकलस्वाराच्या मृतदेहाला चिरडून अनेक वाहने पुढे जात होती. यामुळे मृतदेह छिन्न-विछिन्न झाला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सातत्याने वाहने मृतदेहावरून गेल्याने त्याची ओळख पटविणे कठीण झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.