धक्कादायक! बारावी पास बोगस डॉक्टरकडून प्रेमी युगुलांचा अवैधरित्या गर्भपात; इंटरनेटवरून उपचार

नागपूर : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी नागरिक मिळेल त्या ठिकाणी जात आहेत. डॉक्टरदेखील दिवसरात्र एक करून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र नागपूरमध्ये एका बोगस डॉक्टरने अनेक रुग्णांवर उप चार केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एवढेच नाही तर या बोगस डॉक्टरने अनेक प्रेमीयुगुलांचे अवैधरित्या गर्भपात केल्याचेही सांगण्यात येत आहे.

बारावी पास बोगस डॉक्टरला नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरातून अटक करण्यात आली आहे. चंदन चौधरी असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. नॅचरोपॅथीचे शिक्षण घेतलेला चंदन चौधरी नावाचा बोगस डॉक्टर इंटरनेटवर पाहून रुग्णांवर उपचार करायचा. पुस्तकं पाहून औषधं द्यायचा. अनेक कोरोनाबाधीत रुग्णांवर याने उपचार केले आहेत. काही कोरोनाबाधीतांचा मृत्यूही झाला आहे.

धक्कादायक म्हणजे प्रेमी युगुलांचा अवैध गर्भपात करण्याचे काम हा बोगस डॉक्टर दुप्पट पैसे घेऊन करायचा. याशिवाय तरुणी-महिलांना नर्सिंगचं प्रशिक्षणंही द्यायचा. कामठी पोलिसांनी सैलाबपुरा परिसरात छापा टाकून त्याला अटक केली आहे.

चंदन चौधरीने नागपुरात आपला पसारा मांडला होता. केवळ 12 वी पास असलेल्या या बोगस डॉक्टरने येईल त्या रुग्णाला औषध देण्याचे काम केले. हा बहाद्दर इंटरनेटवरुन माहिती मिळवायचा. एखादा रुग्ण दवाखान्यात आला की त्यावरचे औषध तो इंटरनेवर सर्च करायचा, सर्च केलेले औषध रुग्णांना लिहून द्यायचा. इतकंच नाही तर पुस्तकं वाचून त्याने अनेकांना औषधं दिली होती. धक्कादायक म्हणजे हा डॉक्टर प्रेमी युगुलांना टार्गेट करत होता. जास्त पैसे उकळून अवैधरित्या गर्भपात केल्याचे अनेक प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.