जामखेड (प्रतिनिधी) : जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे एका महिलेसह तीन मुलींचा विहीरीत मृतदेह आढळून आला आहे. अद्याप कारण मात्र समजू शकले नाही. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील भोगलवाडी शिवारात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका महीलेस तीच्या तीन मुलींचा मृतदेह विहीरीतील पाण्यात आढळुन आला. मात्र घटना नेमकी कशा मुळे घडली हे अद्याप समजु शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच कुसडगाव येथील सरपंच हवा सरनोबत, पोलीस पाटील निलेश वाघ माजी पंचायत समिती सदस्य शरद कार्ले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सदरची घटना तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना सांगितली. या नंतर त्या दोघांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.
एक तासानंतर चारही मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहीरी बाहेर काढले. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. आईसह तीन मुलींचे मृतदेह विहिरीत अढळुन आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.