पुणे- एकमेकांकडे पाहण्याच्या कारणतून झालेल्या वादात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी, विशाल कैलास बाणेकर (वय.23), अनिकेत अनंत कसबे (वय.18), प्रफुल्ल गणेश कसबे (वय.19), अजय युवराज कसबे (वय.19,राहणार सर्वजन लक्ष्मीनगर येरवडा) या चाैघांना अटक केली असून, अर्जून सोनावने याच्यासह अन्य साथीदारांवर येरवडा पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टसह खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
महेश निगडे असे वार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ गणेश सुभाष निगडे (वय. 35,रा.संतनगर लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास बीडीगामगार वसाहत शेजारी येरवडा येथे घडला आहे.