Shocking : मंगळदोष काढण्यासाठी शिक्षिकेचं विद्यार्थ्याशी लग्न; केला हळदी-मधुचंद्राचा विधी

जालंधर – जन्मपत्रिकेत असणारा मंगळाचा दोष काढून टाकण्यासाठी एका शिक्षिकेने आपल्या 13 वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती विवाह केला. एवढेच नव्हे तर त्याच्यासोबत मधुचंद्रही साजरा केल्याचे धक्कादायक बातमी समोर येत आहे. या विद्यार्थ्याने आपल्या पालकांना ही घटना सांगितल्यानंतर त्यावर प्रकाश झोत पडला.

या मुलाच्या कुटुंबियांनी या विवाहाची माहिती पोलिसांना दिली. जालंधर जिल्ह्यातील बस्ती बावा खेल भागात हा खळबळजनक प्रकार घडला. मंगळाचा दोष काढून टाकण्यासाठी एका अल्पवयीन मुलासोबत प्रतिकात्मक विवाह करण्याचा सल्ला एका ज्योतिषाने दिला होता. या शिक्षिकेच्या घरात हा अल्पवयीन मुलगा शिकवणीसाठी जात असे. त्यालाच तिने वर म्हणून निवडले. एक आठवडाभर काही विषयांची तयारी करून घेण्यासाठी त्याच्यासोबत रहायचे असल्याचे तिने त्याच्या कुटुंबियांना सांगितले.

मुलाच्या कुटुंबियांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्याच्या पालकांनी सांगितले की, या महिलेने त्यांच्या मुलासोबत जबरदस्तीने विवाह केला. हळदी, मेहंदी पासून ते मधुचंद्रापर्यंत सारे विधी पार पाडण्यात आले. त्यानंतर निलाजरे पणाचा कळस म्हणजे त्या महिलेने बांगड्या फोडून पतीचा मृत्यू झाल्याचा कांगावा रचला. तिच्या कुटुंबियांनी शोकसभेचे आयोजनही केले. अनेकांनी तिचे सांत्वनही केले.

या विावहाबाबत तक्रार झाल्याचे समजताच ही महिला पोलिस ठाण्यात पोहोचली. तिथे तिने हा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला. ज्योतिषाने सांगितलेल्या मंगळ दोषामुळे आपले कुटुंबीय आपल्या विवाहाच्या चिंतेत होते, असे या महिलेने पोलिसांना सांगितले. या शिक्षिकेच्या कुटुंबियांनी ही फिर्याद मागे घेण्यासाठी या मुलाच्या कुटंबियांवर दबाव आणला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.