धक्कादायक ! नवरा घेत होता गळफास; वाचविण्याऐवजी बायको बनवत होती व्हिडीओ

कोलकाता – महिला गळफास घेत असताना तिच्या सासरच्या मंडळीने तिचा जीव वाचविण्याचऐवजी आत्महत्येचा व्हिडीओ तयार केल्याची घटना ताजी असताना अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती पंख्याला दोर बांधून गळफास लाऊन आत्महत्या करत होता. त्यावेळी त्याची पत्नी तिथेच उपस्थित होती. मात्र, तिने त्याला आत्महत्येपासून रोखण्याऐवजी त्याचा आत्महत्येचा व्हिडीओ बनवला. पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

पती गळफास घेत असताना सगळा प्रकार पत्नीच्या मोबाईलमध्ये कैद झाला. संबंधीत प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. आरोपी महिलेच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या व्हिडीओत दोघांमध्ये तिसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीवरून वाद सुरू होता, असं समोर आलं आहे.

या दाम्पत्याच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं होतं. मात्र, वर्षभरात दोघांमधील संबंध बिघडले होते. पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहेत, असा आरोप पतीकडून सातत्याने केला जात होता. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये सारखा वाद व्हायचा. पतीने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा देखील याच विषयावर वाद सुरू असल्याची माहिती व्हिडीओतून समोर आली आहे.

आरोपी पत्नीचं नाव नेहा शुक्ला (२२) असं असून तिचं गेल्यावर्षी 11 डिसेंबरला अमिन साव नावाच्या युवकाशी लग्न झालं होतं. दरम्यान अमिन सावच्या बहिणीने नेहाचा मोबाईल पाहिला तेव्हा तिला भावाच्या आत्महत्येचा व्हिडीओ दिसला. त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आलं.

दरम्यान पतीला वाचवलं का नाही, असा सवाल करण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, मला वाटलं अमिन मस्करी करत आहे. मात्र त्याने खरच आत्महत्या केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.