बेंगळुरू – एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका पोलिस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. गंभीर बाब म्हणजे पीडिता बलात्काराची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली असतानाच तेथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
याबाबत माध्यमांशी बोलताना पोलिस आयुक्त बी. दयानंद म्हणाले की, १७ वर्षीय बलात्कार पीडितेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका पोलिस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. पीडित महिला पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी आली होती आणि मदत मिळवण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
त्यांनी सांगितले की, या प्रकरणात बोमनहल्ली पोलिसांनी एका कॉन्स्टेबलसह दोन आरोपींना अटक केली आहे आणि त्यांना तुरुंगात पाठवले आहे. बोम्मनहल्ली पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले कॉन्स्टेबल अरुण आणि पीडितेचा मित्र विक्की यांना बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या आईने या प्रकरणाबाबत बोम्मनहल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.