Shocking! हार्ट पेशंटवर उपचार करताना डॉक्टरचाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नवी दिल्ली : हैद्राबादमधून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. एका रुग्णालयात हार्ट पेशंटवर उपचार करत असतानाच एका डॉक्टरला हृदयविकाराचा  झटका येऊन त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

हैद्राबादमधील गुजाला भागात राहणारा 60 वर्षीय जगिया नाईक यांना रविवारी सकाळी हार्ट अटॅक आला होता. त्यांना उपचारासाठी गांभारी मंडलच्या एसवी श्रीजी नर्सिंग होम येथे आणण्यात आले. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये डॉ. लक्ष्मण त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पोहोचले. डॉ. लक्ष्मण रुग्णावर उपचार करीत होते, तेवढ्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. यात त्यांचा  जागीच मृत्यू झाला.

डॉक्टरचे वय अवघे 40 वर्षे असल्याचे  सांगितले  जात आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉ. लक्ष्मण यांना सहकाऱ्यांनी आपात्कालीन उपचार दिले. मात्र त्यांना वाचवता आले नाही.  यादरम्यान उपचार घेत असलेले नाईक यांची प्रकृती बिघडली. रुग्णाचे कुटुंबीय त्यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र दुसऱ्या रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले .  या घटनेमुळे एकाच वेळी दोन कुटुंबावर मोठा आघात झाला असल्याचे बोलले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.