पुणे – जेवणाची टेस्ट न लागल्याने संतापलेल्या एकाने जेवन बनविणार्या शेफला हातोड्याने मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या शेफचा मृत्यू झाला. कोंढव्यातील उंड्री परिसरातील मिलेनियम लेबर कॅम्पमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
कमल नारायण मार्डी (४९, रा.जियापुर, पश्चिम बंगाल) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, शुभम शास्त्री सरकार (६३, रा. पश्चिम बंगाल) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास उंड्री येथील मिलेनियम लेबर कॅम्प येथे ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, उंड्री भागात कंन्स्ट्रक्शन साईटवर लेबर कॅम्प आहे. या कॅम्पमध्ये कमल मार्डी, शुभम सरकार यांच्यासह इतर कामगार राहण्यास आहेत.
रविवारी शुभम सरकार यांनी सर्वांसाठी जेवण बनविले होते. त्याची टेस्ट न लागल्याने मार्डी आणि सरकार यांच्यामध्ये वादावादी झाली. यातूनच आरोपी मार्डी याने हातोडा उचलून शुभम सरकार यांच्या नाकावर मारला.