धक्कादायक ! लग्नाची पाठवणी करताना भावूक नववधूला आला हृदयविकाराचा झटका अन्….

नवी दिल्ली : लग्न हा सर्वांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. कुटुंबातील सदस्य असो कि नवीन जोडपे…हा क्षण कायम स्मरणात ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र हीच सुखाची घटना एका क्षणात दुःखात बदलली तर…होय लग्न झाल्यानंतर मुलीची पाठवणी करताना नववधू एवढी रडली कि तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा जागीच मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ओडिशा जिल्ह्यातील सोनपीर या गावात हि धक्कादायक घटना घडली आहे. गुप्तेश्वरी सहा अका रोझी असं मृत्यू झालेल्या दुर्दैवी नवरीचे नाव आहे. जुलन्दा गावातील रोझी हीच तेतेलगाव मधील बिसिकेसन नावाच्या तरुणीशी शुक्रवारी विवाह झाला होता. मात्र ज्यावेळी पाठवणीची वेळ आली त्यावेळी तिला आपल्या आई वडिलांना सोडून जाण्याचे दुःख सहन झाले नाही. त्यामुळे ती ओक्शा बोक्शी रडत होती. मात्र ती रडत असताना अचानक जमिनीवर कोसळली. नातेवाईकांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती उठत नव्हती. त्यावेळी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, रोझीच्या नातेवाईकांनी सांगितले कि, काही दिवसापूर्वी रोझीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. त्यातच तिच्या नातेवाईकांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून तिचा विवाह लावून दिला होता. मात्र नियतीला काही तरी दुसरेच मान्य होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.