नवी दिल्ली : आज जगात कोरोनाबाधितनाची संख्या ज्या झपाट्याने वाढत आहे तसेच कोरोनमुक्त होणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. मात्र कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत नवीन संशोधन समोर आले आहे जे धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे. कोरोनामुळे रुग्णांमध्ये मेंदूच्या काही भागांवर परिणाम झाल्याचे संशोधनात आढळून आले आहे. ‘लॅन्सेट सायकााट्रिक जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कोरोनामुक्त झालेल्या पाचपैकी एक रुग्ण (२० टक्के) तीन महिन्यात मानसिक आजाराने ग्रस्त होत असल्याचे समोर आले आहे.
"Survivors of COVID-19 appear to be at increased risk of psychiatric sequelae, and a psychiatric diagnosis might be an independent risk factor for #COVID-19."
New #Free Researchhttps://t.co/i00uBVdV0O
— The Lancet Psychiatry (@TheLancetPsych) November 10, 2020
‘लॅन्सेट सायकााट्रिक जर्नल’नं अमेरिकेतील ६९ हजार करोनाबाधित रुग्णांवर संशोधन केलं होतं. या संशोधनात इलेक्ट्रॉनिक आरोग्याच्या नोंदीचेही विश्लेषण करण्यात आले आहे. संशोधनानुसार कोरोनामुक्त झालेल्या २० टक्के रुग्ण चिंता, नैराश्य किंवा निद्रानाशाने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. तसेच वेड लागणे, मेंदू कमकुवत होणे आदि समस्यादेखील आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या आजारासाठी नवीन उपचार पद्धत शोधून त्यावर भर देणे गरजेचे असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या संसर्गानंतर आपण बरे झालो म्हणजे सगळे आलबेल झाले असे समजणे चुकीचे आहे. कारण त्यामुळे मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होत आहेत. लेखक पॉल हॅरिसन यांच्या मते, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये चिंता आणि नैराश्याची चिन्हे दिसण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे रोगप्रतिकारक यंत्रणेद्वारे हा विषाणू मानवी मेंदूचे थेट नुकसान करू शकतो. दुसरे कारण म्हणजे, कोरोना असल्याच्या अनुभवामुळे आणि पोस्ट कोविड सिंड्रोमच्या भीतीमुळे लोक चिंताग्रस्त होऊ शकतात.