डीएनए टेस्टमधुन सत्य उघडकीस
वॉशिंग्टन : अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेला तिच्या पूर्व प्रियकराबद्दल धक्कादायक गोष्ट समजली. कॉलेजच्या जमान्यात ज्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती, तो बॉयफ्रेंडतिचा सावत्र भाऊ निघाला. महिलेला हे समजल्यानंतर मोठा धक्का बसला. तिला जी गोष्ट माहित नव्हती, ती डीएनए टेस्टमुळे उघड झाली.
विक्टोरिया हिल असे या महिलेच नाव आहे. विक्टोरिया अमेरिकेच्या कनेक्टिकट येथे एक क्लिनिकल सोशल वर्कर म्हणून काम करते. एक दिवस जेव्हा तिने आपल्या कुटुंबाची वंशावळी शोधली, तेव्हा तिला ही धक्कादायक गोष्ट समजली. विक्टोरियाने सांगितलं की, ‘अलीकडेच तिला हायस्कूलमधला तिचा प्रियकर एक गेट टुगेदरमध्ये भेटला होता. तिथे त्याने विक्टोरियाला एका घटनेबद्दल सांगितलं, त्यामुळे फक्त तीच नाही, तिच्या कुटुंबालाही धक्का बसला.
विक्टोरियाने सांगितलं की, जेव्हा तिची आई गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा ती एक डॉक्टरला भेटलेली. डॉक्टरने त्यांना सांगितलेलं की, गर्भधारणेसाठी एका अज्ञात मेडीकल विद्यार्थ्याच्या शुक्राणूचा वापर करु. वास्तवात तो शुक्राणू त्या डॉक्टरचा होता. या बद्दल विक्टोरियाच्या आईला माहिती नव्हतं. एकदिवस जेव्हा विक्टोरियाला तिच्या आरोग्यासंबंधी काही लक्षण दिसली. त्यावेळी तिने डीएनए चाचणी केली. त्या रिपोर्टमुळे तिला धक्का बसला. ज्या व्यक्तीने तिच पालनपोषण केलेलं, वास्तवात तो तिचा पिता नव्हता.
रिपोर्ट्सनुसार विक्टोरियाला नंतर समजलं की, तिच कुटुंब ती विचार करते, त्यापेक्षा खूप मोठं आहे. तिला 23 भाऊ-बहिण आहेत. त्या सगळ्यांचा जन्म त्या डॉक्टरपासून झाला होता. विक्टोरियाचा ऐकून जेव्हा तिच्या एक्स बॉयफ्रेंडने डीएनए टेस्ट केली, तेव्हा त्याचा रिपोर्टही धक्कादायक होता. विक्टोरिया आणि तो सावत्र भाऊ-बहिण होते. यामुळे तिला धक्का बसला. ज्याच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये होती, तो तिचा सावत्र भाऊ निघाला.