धक्कादायक! महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू

अलाहाबाद : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी हे सोमवारी बाघंबरी मठातील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. ते निरंजनी आखाड्याचे प्रमुखही होते. अ. भा. आखाडा परिषद ही देशातील सर्व संतांची सर्वात मोठी संघटना आहे.

महंत त्यांच्या खोलीत छताला टांगलेल्या अवस्थेत आढळल्याचे अलाहाबादचे पोलीस अधीक्षक दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले, मात्र त्यांनी अधिक तपशील दिले नाहीत.

महंत यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच पोलीस व प्रशासनातील अनेक अधिकारी मठात पोहोचले असून ते मठाबाहेर तळ ठोकून आहेत. पोलिसांव्यतिरिक्त कुणालाही मठात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.