धक्कादायक! शिक्षणाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

सोलापूर: शिक्षणाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने हतबल विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला. रुपाली रामकृष्ण पवार असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मोहोळ तालुक्‍यातील देगावची रहिवासी होती. रुपालीने कीटकनाशक प्राशन करुन आयुष्य संपवले.

रुपाली रामकृष्ण पवार हिचा पंजाबच्या जालिंदर शहरातील लव्हली प्रोफेशनल अकादमीला बीटेकसाठी प्रवेश निश्‍चित झाला होता. या प्रवेशासाठी आवश्‍यक असलेल्या सीईटी पात्रता परीक्षेत रुपालीने 89 टक्के गुण मिळवले होते. पंजाब इथे दहा हजार भरून रुपालीने आपला प्रवेश निश्‍चित केला होता. उर्वरित एक लाख रुपये भरण्यासाठी 20 जुलैची मुदत होती. मात्र मुदतीत फी भरणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे रुपालीने रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.

रुपालीची फी भरण्यासाठी वडिलांनी शेती विकायला काढली होती. मात्र शेतीला कवडीमोल भाव येत असल्याने शेतीची विक्री झाली नाही. त्यामुळे अशी दुर्दैवी वेळ आल्याचे गावकरी आणि नातेवाईकांच म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.