धक्कादायक! रिक्षा चालकाला करोना लस पडली तब्बल 25 लाखांना; काय आहे प्रकरण वाचा

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाट थोपवण्यासाठी लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.  या सर्व परिस्थिती लोक लसीकरणासाठी घराबाहेर पडताना दिसत आहे. परंतु, लसीसाठी घराबाहेर पडणे एका रिक्षा चालकाला चांगलीच महागात पडली आहे.

दिल्लीतील एका रिक्षा चालकाला  लस  चक्क लाखांच्या घरात  पडली आहे. कारण  अरविंद कुमार पटवा नामक रिक्षा चालक  हा आपल्या पत्नीसह सकाळी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गेला होता. जाताना त्याने आपल्या मुलांना त्यांच्या आजोळी सोडले.  त्यानंतर ते आपल्या पत्नीसह लसीकरण केंद्रावर गेले.  तिथे त्याला लस घेण्यासाठी उशीर झाला.

दरम्यान, घरी कोणीही नसल्याने पाहत चोरटयांनी त्यांच्या घरातील दागिने आणि रोकड रक्कम लंपास केले.  लस घेऊन हे दाम्पत्य घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघड दिसला. त्यानंतर त्यांनी आतमध्ये जाऊन बघितले असता  त्यांना हा सर्व प्रकार माहिती झाला.

दागिने आणि रोख रक्कम मिळून तब्ब्ल २५ लाख रुपये चोरटयांनी लंपास केल्याचे संगणयत येत आहे. पटावा यांनी चोरटयांनी सर्व मौल्यवान वस्तू  लंपास केल्या असून  आमच्या शेजार्‍यांनी सांगितले की, आम्ही घरी नसताना त्यांना एक व्यक्ती घराबाहेर बसलेली दिसली आणि एखाद्याशी फोनवर बोलत असल्याचे आम्हाला आढळले. आम्ही त्याला संशयित असल्याचे सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.