वाझेंसंदर्भात धक्कादायक खुलासा ! परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढणार

मुंबई – मुंबईत मायकल रोडवर स्फोटकांनी गाडी सापडल्या प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे. सचिन वाझे यांच्या नियुक्तीची शिफारस ही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीच केली होती, हे आता पत्रासह समोर आले आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्ह आहे.

सचिन वाझे निलंबित असताना त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. याबद्दल तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 25 मे 2020 रोजी पत्र लिहून सचिन वाझे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली होती. त्यांच्या शिफारसीनंतर सचिन वाझे यांची गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

हा विभाग मुंबई क्राईम ब्रांचच्या अंर्तगत येतो. त्यामुळे सचिन वाझे यांचे डिटेक्‍शन क्राईम ब्रांचचे उपायुक्त प्रकाश जाधव, जॉईंट सिपी मिलिंद भारंबे हे वरिष्ठ होते. त्यांना रिपोर्ट करणे वाझे यांना बंधनकारक होते. मात्र, सचिन वाझे हे थेट तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या संपर्कात होते.

परमबीर सिंह यांची एनआयए चौकशी
आज परमबीर सिंह यांना एनआयएची पायरी चढावी लागली. परमबीर सिंह यांच्यासह अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज साधारणपणे सकाळी साडेनऊच्या सुमारास परमबीर सिंह हे चौकशी करता एनआयएच्या मुंबई कार्यालयात हजर झाले. एनआयए सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंग यांना एनआयएनने चौकशी करता समन्स बजावला होता. याच बरोबर त्यांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात देखील आणण्यास सांगितले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.