कल्याण – कल्याण पुर्व भागात राहणाऱ्या एका युवतीने तिच्यावर सात जणांकडून गेली दीड वर्ष केल्या जाणाऱ्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. ही युवती अलिकडेच बारावी उत्तीर्ण झाली आहे. त्या परिक्षेत तिला 71 टक्के मार्क पडले आहेत. दोन दिवसांपुर्वी तिने गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली.
पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला असता त्यावर तिने सुसाईड नोट लिहीली आहे त्यात तिने ही कहाणी कथन केली आहे. तिचे एका मुलाशी संबंध होते. त्याची व्हिडीओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार केले जात होते. तब्बल सात जणांनी तिच्यावर आत्तापर्यंत बलात्कार केला आहे.
ही सारी त्याच भागातील धनदांडग्यांची पोरे आहेत. या मुलांना मदत करण्याचे काम त्या पीडितेची एक मैत्रिणच करीत होती. पोलिसांनी या सगळ्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. आपल्या मुलीने आत्महत्या केली की तिला छतावरून ढकलून दिले गेले याची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी तिच्या पालकांनी केली आहे.