धक्कादायक! करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; कराड तालुक्यातील घटना

कराड – करोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. शुक्रवार दि 16 रोजी रेठरे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपारी साडेबाराच्या सुमारास करोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस टोचली.

त्यानंतर दहा मिनिटात लस घेणाऱ्या व्यक्तीला चक्कर आली. त्या व्यक्तीला उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलला नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. संपत राजाराम जाधव (वय ५९, रा. रेठरे बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

जिल्हा आरोग्य विभागकडून खुलासा

संपत राजाराम जाधव (वय 59, रेठरे) यांचा समावेश असलेल्या एईएफआय (लसीकरणानंतरचा प्रतिकूल घटना),असल्याची माहिती 16 April एप्रिलला मिळाली. लसीकरणानंतर त्याने उच्च रक्तदाब आणि अस्वस्थता नोंदविली. त्याला आणीबाणीची औषधे दिली गेली आणि रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक अहवालात असे सूचित केले गेले आहे की, हे लसीकरणाशी संबंधित नाही. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी एसडीएच कराड येथे शवविच्छेदन केले जात आहे. पुढे, डी.एच.ओ अंतर्गत जिल्हा एईएफआय समिती मृत्यूचे कारण शोधण्यासाठी या प्रकरणाचे मूल्यांकन करेल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.