धक्कादायक! चोरी करण्यास विरोध केल्याने महिला वॉचमनचा खून; पिंपरीतील घटना

पिंपरी – चोरी करण्यास विरोध केल्याने वॉचमन महिलेचा खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. 16) सायंकाळी किवळे येथे उघडकीस आली. सौंदव सोमेरू उराव (वय 40) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत तिचा पती सोमेरू येतावा उराव (वय 46, सध्या रा. किवळे ब्रीज जवळ, किवळे. मूळ रा. बंगाल) यांनी शुक्रवारी (दि. 17) याबाबत देहूरोड पोलीस ठाण्याच्या अंकित असलेल्या रावेत पोलीस चौकी येथे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सोमेरू यांची पत्नी सौंदव ही ते राहत असलेल्या गोविंद बिल्डर यांच्या बांधकाम साइटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर गेली. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तिचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या लिफ्टच्या खड्ड्यात मिळून आला. चोरट्यांनी बांधकाम साइटवरील रोख 30 हजार रुपये, 700 रुपयांची चांदीची चेन आणि सहा हजार रुपये किंमतीचे कानातील सोन्याचे झुबे असा ऐवज चोरून नेला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी खून केला असावा, अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.