धक्कादायक! रुग्णालयात हळूने बोलण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरवर चाकूहल्ला; व्हिडिओ व्हायरल

नांदेड : राज्यात कोरोनाने एकीकडे कहर केला आहे. तसेच प्रत्येक डॉक्टर कोरोना रुग्णाल योग्य तो उपचार मिळावेत दिवसरात्र झटत आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्या कंची दाखल न घेता उलट त्यांच्यावर हल्ले होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे. नांदेडमध्ये एका रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरांवर हल्ला केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात विविध रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याच रुग्णालयात डॉक्टरांवर जीवघेणा चाकू हल्ला झाला आहे. या डॉक्टराने रुग्णाच्या नातेवाईकांना मोठ्याने बोलू नका. त्यामुळे इतरांना त्रास होतो, अशी सूचना दिली होती.

मात्र त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकाला राग अनावर झाला. तो नातेवाईक बाजूला असलेला चाकू घेऊन डॉक्टरांच्या दिशेने धावत गेला. मात्र त्याचवेळी उपस्थितीतांनी त्याला अडवल्याने अनुचित प्रकार टळला. ही सर्व घटना एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच हा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

दरम्यान या प्रकारानंतर संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब गायकवाड असे या आरोपीचे नाव आहे. सध्या त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.