नवी दिल्ली : कर्नाटकसह देशातील राजकीय वर्तुळाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एसएल धर्मगौडा यांनी आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह आढळून आला. सोमवारी मध्यरात्री दोन वाजता त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना मृतदेह सापडलेल्या ठिकाणी धर्मगौडा यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोटही सापडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
Karnataka: Body of SL Dharmegowda, Deputy Speaker of State Legislative Council was found on a railway track near Kadur in Chikkamagaluru. A suicide note has been recovered.
— ANI (@ANI) December 29, 2020
जेडीएसचे नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. चिक्कामागलुरू जिल्ह्यातील कादूरजवळील एका रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे.
It is shocking to learn the news of Deputy Speaker of State Legislative Council and JDS leader SL Dharmegowda's suicide. He was a calm and decent man. This is a loss of the state: HD Deve Gowda, former PM and JDS leader (File pic) https://t.co/3NHL9rJElz pic.twitter.com/BtdaLzjtwF
— ANI (@ANI) December 29, 2020
धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक असल्याचं माजी पंतप्रधान व जेडीएसचे नेते एचडी देवगौडा यांनी म्हटले आहे. “विधान परिषदेचे उपसभापती आणि जेडीएसचे नेते एसएल धर्मगौडा यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला आहे. ते एक शांत आणि सभ्य नेते होते. त्यांच्या जाण्याने राज्याचे नुकसान झालं आहे,” अशा शब्दात देवगौडा यांनी शोक व्यक्त केला आहे.
६४ वर्षीय धर्मगौडा हे अलिकडेच चर्चेत आले होते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले होते. बेकायदेशीरपणे सभागृहाच कामकाज चालवत असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदारांनी केला होता.