मुंबई – बॉलीवूडमधील पॉप्युलर स्टार डॉटर्सपैकी एक असलेली अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडिओज् चाहत्यांशी शेअर करत आहे.जान्हवीचा नुकताच रोही चित्रपटातील लुक चर्चेत होता.
View this post on Instagram
सोशलवर तिने शेअर केलेले फोटो खूपच व्हायरल झाले होतात. जान्हवीने वेगवेगळया साडयांमध्ये केलेले हे फोटोशूट चाहत्यांना आवडत असून तिच्या लुकचे सर्वत्र कौतुक होत आहे.तिने शेअर केलेल्या फोटोमधील चाहत्यांच्या कंमेंट्स सुद्धा तितक्याच असतात नुकताच तिच्या फोटोवरील कंमेंट्स चांगलीच चर्चेत आली आहे. जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी नुकतेच प्रश्नोत्तरांचे सेशन ठेवले होते. त्यावेळी तिला अनेक चाहत्यांनी तिचे आगामी चित्रपट आणि तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले आणि जान्हवीनेही या प्रश्नांची उत्तरेही दिली. पण यातील एका चाहत्याने मात्र जान्हवीकडे विचित्र मागणी केली. त्याने लिहिले की, ‘आपण किस करू शकतो का?’ आणि चाहत्याच्या या प्रश्नाला जान्हवीने मजेशीर अंदाजात उत्तर सुद्धा दिले.
View this post on Instagram
या फोटोसोबत जान्हवीनं ‘नो’ अर्थात नाही असे लिहिले. जान्हवीचा हा हटके अंदाज सर्वांनाच भावला आहे. तिच्या या उत्तरामुळे सोशल मीडियावर तिचे कौतुक होताना दिसत आहे. सोबतच अशी विचित्र मागणी करणाऱ्या चाहत्याची खिल्ली उडवली जात आहे.वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, जान्हवी कपूर लवकरच “किटी’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय “दोस्ताना-2′ आणि “तख्त’ चित्रपटातही ती भूमिका साकारत आहे. नुकतेच ‘गुड लक जेरी’चे पहिले शेड्युल पूर्ण केले आहे. हा साऊथ स्टार नयनतारा अभिनित तमिळ चित्रपटाचा कोलामावू कोकिलाचा रिमेक आहे.