धक्कादायक ! होम क्वारंटाईन होण्याऐवजी डॉक्टरांनी केले लहान मुलांवर उपचार  

मुंबई :  देशात सध्या कोरोनाव्हायरसमुळे थैमान माजलं आहे. जगासह भारतातही आता “करोना’ हातपाय पसरु लागला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. एक रुग्ण मुंबईत, 2 पुण्यात आणि 2 बुलढाण्यात असे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक लोक संक्रमित झाले आहेत. अशातच  नवी मुंबईत डॉक्टरांकडून एक धक्कादायक कृत्य समोर आलं आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या घरातील सदस्यांनाच 14 दिवस होम क्वारंटाईन होणं गरजेचे आहे. पण यानंतरही डॉक्टरांनी नियम न पाळता रूग्णालयात येवून लहान मुलांवर उपचार केले. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पनवेल आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडून डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.

पनवेल महापालिकेने संपूर्ण रूग्णालय सिल केलं आहे. सर्व रुग्णांची आणि तपासणी करून गेलेल्या रुग्णांची चाचणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांचा संख्या दिवसागणिक वाढत चालला आहे. सोमवारी राज्यात कोरोनाचे 47 नवे रुग्ण समोर आले तर आज पुन्हा 5 नव्या रुग्णांना कोरोना झाला असल्याचं समोर आलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.