पुणे – एका महिलेने तीच्या मैत्रिणीला घरी बोलावत दोघांबरोबर शरीरसंबंध ठेवण्याची “ऑफर’ दिली. पिडीतेने नकार देताच तीच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान पिडीत महिलेने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेत तेथून पळ काढला.
याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात सुवर्णा हिरवे आणि तीच्या दोन पुरुष साथीदारांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बालाजीनगर येथील सिध्दार्थ कॉम्पलेक्समध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी सुवर्णा हिरवे हिने तीच्या मैत्रीणीला घरी बोलावून घेतले होते. तेव्हा तेथे तीचे दोन पुुरुष साथीदार उपस्थित होते. सुवर्णा हिने पिडीतेस तू त्या दोघांना खुप आवडतेस, तु त्यांच्या सोबत शारीरीक संबंध ठेव, मी त्यांना चार ते पाच हजार रुपये देण्यास सांगते असे सांगितले.
परंतू पिडीतेने नकार देताच तीने पिडीतेवर पैसे चोरल्याचा आळ घेत भांडण केले. पिडीता खोलीतून बाहेर येताच दोघाही आरोपींनी तीचा विनयभंग करत मारहाण केली. पिडीतेने कशीबशी सुटका करत तेथून पळ काढला.