नवी दिल्ली : सध्याच्या जगात पावलोपावली टेक्नॉलॉजीची आवश्यकता भासत असल्याची परिस्थिती आहे. टेक्नॉलॉजीच्या अतिवापरामुळे हॅकिंगचे प्रमाण देखिल दिवसेंदिवस वाढतच चालले असल्याची परिस्थिती आहे. त्यातून हॅकिंगचे नवनवे प्रकार समोर येताना पाहायला मिळत आहेत. परंतु हे हॅकिंग कोण आणि कसे करते हे अनेकदा गुलदस्त्यातच रहाते.
हॅकर्सना हि माहिती मिळते कुठून हा सर्वानाच पडलेला प्रश्न आहे. परंतु आता एका अहवालातून मोठा खुलासा झाला असून हॅकर्स स्मार्टफोनचा वापर करून युजर्सचा डेटा चोरत असल्याच या अहवालात म्हटले आहे. 10 प्रसिद्ध अँड्रॉईड स्मार्टफोनला आता हॅकिंगचा फटका बसला असून, हे स्मार्टफोनला हॅक करुन त्यातील माहितीची हेरगिरी केली जाऊ शकते अशी धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
सिक्यॉरिटी रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, ब्लूटूथ आणि यूएसबीचा वापर करुन हेरगिरी केली जाऊ शकते असा दावा या करण्यात आला आहे. यासाठी अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये AT कमांडची मदत घेतली जाते. बेसबँड सॉफ्टवेअरशी कम्युनिकेट करण्यासाठी अँड्रॉईडमध्ये AT कमांडचा वापर केला जातो. रिपोर्टनुसार, हॅकर्स IMEI आणि IMSI नंबर मिळवण्यासाठी, फोन कॉल रोखण्यासाठी, हे फोन कॉल्स इतर नंबरवर वळवण्यासाठी, कॉलिंग फीचर ब्लॉक करण्यासाठी आणि इंटरनेट बंद करण्यासाठी या ट्रिकचा वापर करू शकतात. या रिपोर्टमध्ये 10 प्रसिद्ध अँड्रॉईड फोनचीही यादी देण्यात आली आहे ज्याचा वापर हॅकर्स करू शकतात.
अॅप्लिकेशन प्रोसेसरकडून बेसबँड प्रोसेसरला कनेक्ट होण्यासाठी AT कमांड जारी केली जाते. जेव्हा स्मार्टफोन Apps आणि फोनमधील इतर फीचर्सवर AT कमांड पाठवण्यासाठी अडथळा येतो, तेव्हा अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये यूएसबी आणि ब्लूटूथला यात अॅक्सेस दिला जातो. हॅकर्सकडून याच टेक्निकचा वापर केला जातो. 14 पेक्षा जास्त AT कमांड आहेत, ज्याद्वारे फोन हॅक केला जाऊ शकतो, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.