मुंबई – मुंबईच्या कुर्ला भागात एका 42 वर्षीय महिलेवर तिच्या घरात घुसून तिघांनी सामूहिक बलात्कार केला, आणि तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या आरोपींनी सदर महिलेच्या गुप्तांगावर सिगारेटच्या सहाय्याने जखमा केल्या आहेत, असे मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना बुधवारी पहाटे कुर्ला येथे घडली, अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आणि पीडित एकाच ठिकाणी राहतात.
आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आणि अनैसर्गिक कृत्य देखील केले. त्यांनी तिच्या खासगी भागावर सिगारेटचे चटके दिले आणि तिच्या छातीवर आणि दोन्ही हातांवर धारदार शस्त्राने वार केले.
एका आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तिने या प्रकरणी तक्रार केल्यास तो प्रसारित करण्याची धमकी दिली. या महिलेने शेजारी राहणाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेतील आरोपी फरारी आहेत.