भोपाल – मध्य प्रदेशातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व सामान्यांना या गुन्हेगारीचा अधिक त्रास सहन करावा लागत असताना आता माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील वृद्ध दाम्पत्याची राहत्या घरी हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चुलत भाऊ आणि वहिणीची ग्रेटर नोएडामध्ये हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे 70 वर्षीय भाऊ नगेंद्र नाथ आणि 65 वर्षीय वहिनी सुमन नाथ आपल्या ग्रेटर नोएडातील Alfa-2 सेक्टरमधील I-24 घरात शुक्रवारी मृत अवस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच गौतमबुद्ध नगर पोलीस कमिश्नर आणि संबंधित अधिकारी, फॉरेन्सिकची टीम, डॉग स्क्वॉडसह घटनास्थळी पोहोचली.
या दुहेरी हत्याकांडात जवळील व्यक्तीचा हात असल्याची शक्यता व्यक्त पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात घरात कोणत्याही प्रकारे जबरदस्ती केल्याचे दिसत नाही. आरोपींनी दाम्पत्याची गळा दाबून हत्या केली. सुमन या भारती योग संस्थानात योगा ट्रेनर होत्या. त्या अनेक दिवसांपासून लोकांना मोफत योग सेवा देत होत्या.
पोलिसांनी सांगितलं की, मृत व्यक्तीच्या घरी रात्री उशिरा पार्टी सुरू होती. घटनास्थळावरुन दारुची बाटली आणि खाण्याचं सामान एकत्र केलं आहे. तसेच बेसमेंटचा तपास केला असता असं दिसतं की, मृतक आणि आरोपी एकत्र बसून दारू पीत होते. दरम्यान पैशावरुन दाम्पत्याची हत्या झाल्याची शक्यता डीसीपी ग्रेटर नोएडा राजेश सिंह यांनी व्यक्त केल आहे. प्रत्येक दिशेने तपास सुरू आहे. लवकरच या प्रकरणाचा खुलासा होईल, असही ते म्हणाले.