धक्कादायक! मुंबईत वरळीत लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत वरळीत लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वरळीतल्या हनुमान गल्लीतील ललित अंबिका या इमारतीत ही घटना घडली आहे.या घटनेत  एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

वरळीतील ललित अंबिका 19 मजली इमारत आहे. या इमारतीचे काम सुरू होते. 19 व्या मजल्यावर काम करत असताना लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. कार पार्किंगसाठी वापरण्यात येणा-या लिफ्ट शाफ्टमध्ये अपघात झाला आहे.

काम सुरू असताना अचानक नवव्या मजल्यावरून लिफ्ट खाली आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू असून दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुंबई पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहे. मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली आणि घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले.

आदित्य ठाकरे म्हणाले, घटनेची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल. बचावकार्य अजुनही सुरु आहे. कुणाचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभूत होता याचा तपास करण्यात येईल. प्रत्येक ठिकाणी सुरक्षेचे नियम असतात, ते पाळणं आवश्यक आहे.

घटनेत पाच जणांचा मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहे. आविनाश दास , भारत मंडाल, चिन्मय मंडाल एका मृत्युमुखी पडलेल्या मजुराची ओळख अद्याप पटलेली नाही. तर लक्ष्मण मंडाल हे गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. काम करणाऱ्या मजुरांना सुरक्षा उपकरणं दिली जात नसल्याचा आरोप तेथील काही स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.