नवी दिल्ली : नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले आठ भारतीय हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत सापडले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दामन येथील एका हॉटेलमध्ये हे भारतीय मुक्कामासाठी उतरले होते.
Nepal: 8 tourists from Kerala found dead in a hotel room of a resort in Daman. SP Sushil Singh Rathore of District Police Office, Makwanpur says, “We are yet to identify the name of the deceased. They were using gas heater in the room, suffocation might have caused their death.”
— ANI (@ANI) January 21, 2020
हे सर्व भारतीय पर्यटक केरळचे आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे असे माकवानपूर येथील जिल्हा पोलीस कार्यालयातील पोलीस अधिकारी सुशील सिंह राठोड यांनी सांगितले. त्यांच्या रुममध्ये गॅस हीटर होता. नेपाळमध्ये सध्या थंडी आहे. खोली आतून बंद होती. गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.