धक्कादायक : खंडणीसाठी “स्मार्ट सिटी’च्या सर्व्हरवर सायबर हल्ला

  • 27 सर्व्हरमधील डाटा इन्क्रिप्ट करुन सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान 

पिंपरी – केंद्र सरकारने देशातील काही शहरांना स्मार्ट सिटी बनविण्याचे निश्‍चित केले. त्यात पिंपरी-चिंचवड शहराचाही नंबर लागला आहे. शहराला स्मार्ट करणाऱ्या स्मार्ट सिटीच्या कार्यालयातील सर्व्हरवर हॅकर्सने सायबर ऍटक केला आहे. रॅनसमवेअरने हल्ला करून स्मार्ट सिटीच्या कार्यालयातील 27 सर्व्हरमधील डाटा इन्क्रिप्ट करुन सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. हा सायबर हल्ला 26 फेब्रुवारी 2021 किंवा त्यापूर्वी खंडणीसाठी घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत नागरिकांना विविध सोयी सुविधा देण्यात येणार आहे. या योजनेचे कार्यालय निगडीतील अस्तित्व मॉलच्या जागेत आहे. सध्या या प्रकल्पावर टेक महेंद्रा, क्रिस्टल आणि आर्क्‍स इन्फ्रोटेक या तीन कंपन्या काम करीत आहेत.

स्मार्ट सिटी योजनेत स्मार्ट, पार्किंग, स्मार्ट वॉटर, स्मार्ट, सिवेज, स्मार्ट ट्राफिक, स्मार्ट पर्यावरण, स्मार्ट सीसीटीव्ही अशी विविध कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास 300 सर्व्हर तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी 27 सर्व्हरवर रॅनसमवेअरने फोबोस फॅमेली मॉलवेअरच्या माध्यमातूल हल्ला केला आहे. यामुळे या सर्व्हरवरील डाटा वाचता येत नाही.

स्क्रीनवर पाठविला मॅसेज
या सर्व्हरच्या स्क्रीनवर सायबर गुन्हेगारांनी एक मॅसेज टाकला असून खात्री करण्यासाठी तुमची एक फाईल पाठवा, ती आम्ही रीडेबल करून पाठवितो, असे सांगितले आहे. ती फाइल सायबर गुन्हेगारांनी रीडेबल करून पाठविल्यानंतर ते गुन्हेगार बीटकॉइनच्या माध्यमातून सर्व डाटा रीडेबल करण्यासाठी खंडणी मागतात. खंडणीची पूर्तता केल्यानंतर सर्व डाटा सायबर गुन्हेगार रीडेबल करतात.

रॅनसमवेअरचा इतिहास
1989 मध्ये सर्वप्रथम सायबर गुन्हेगारांनी रॅनसमवेअरच्या माध्यमातून हल्ला करण्याची घटना समोर आली. सुरुवातीच्या काळात सायबर गुन्हेगारांनी हॉस्पिटल इंडस्ट्रीला टार्गेट केले. त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्यानंतरच रुग्णांची माहिती त्यांना परत दिली जात होती. त्यानंतर इतर क्षेत्राला या गुन्हेगारांनी टार्गेट केले. संगणकातील डाटा किती महत्वाचा आहे त्यानुसार ते खंडणी मागत असे.

कशामुळे होतो सायबर हल्ला?
सायबर तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीतून आत्तापर्यंत 30 ते 35 टक्‍के रॅनसमवेअरचा हल्ला हा ई-मेलच्या माध्यमातून झाला आहे. 10 ते 12 टक्‍के हल्ला हा डाऊनलोड केलेल्या फाईलमधून झाला आहे. 10 ते 12 टक्‍के हल्ला हा कोणत्यातरी अनावश्‍यक संकेतस्थळ उडल्याने झाला आहे. तर इतर उर्वरित प्रकरणांमध्ये कशातून हल्ला झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • कसा टाळावा रॅनसमवेअरचा हल्ला
  1. ऑपरेटिंग सिस्टीम अधिकृत वापर
  2. अधिकृत सिस्टीम वेळोवेळी अपडेट करा
  3. फ्री ऐवजी चांगला ऍन्टीव्हायरस वापरा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.